डेक्कन व डेक्कन क्वीनची शनिवारपासून धाव, विस्टाडोम कोच मधून न्याहाळा सह्याद्रीचे सौंदर्य


एलएचबी कोच असलेला विस्टाडोम हा देशातील पहिलाच डबा पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीला जोडण्यात आला आहे. या मार्गावरील रेल्वे ही देशात सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वेगाडी असेल. तिचा ताशी वेग १८० किमी असेल. विस्टाडोमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या डब्याला काचेच्या पारदर्शक मोठ्या खिडक्या आहेत. डब्याचे छप्पर देखील काचेचे असेल. या पारदर्शक डब्यातून प्रवाशांना सह्याद्री डोंगररांगांमधले असंख्य धबधबे, हिरवीगार पर्वतराजी यांचे सौंदर्य अनुभवण्यास मिळणार आहे. विस्टाडोम डब्यात 44 प्रवासी बसू शकणार आहेत. या डब्यात संगीताचाही आनंद लुटता येणार आहे.Deccan and Deccan Queen run from Saturday, beauty of Nihala Sahyadri from Vistadom coach


विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली पुणे- मुंबई इंटरसिटी रेल्वे येत्या शनिवार पासून (दि. २६) सुरू होत आहे. विशेष म्हणजे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील लोकप्रिय डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. देशातील रेल्वेतला हा पहिलाच प्रयोग असून यामुळे प्रवाशांना खंडाळा घाटातील सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

या प्रवासासाठी एका प्रवाशाला ८३५ रुपयांचे तिकीट काढावे लागेल.डेक्कन क्वीन २५ जुनला मुंबईतून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी पुण्याकडे निघेल. ही गाडी पुण्यात रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. तर २६ जुनपासून पुणे स्थानकावर या गाडीची नियमित सेवा सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.यापुर्वी मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला विस्टाडोम कोच जोडला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्याच निर्णय घेतला गेला.

यामुळे प्रवाशांना माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा घाट तसेच लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे, धबधबे या संपन्न निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतील.

डेक्कन एक्सप्रेस (०१००७) ही गाडी शनिवारी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावरून निघून ११ वाजून पाच मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. हीच गाडी (०१००८) पुन्हा पुणे स्थानकावरून दुपारी सव्वातीनला निघून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

Deccan and Deccan Queen run from Saturday, beauty of Nihala Sahyadri from Vistadom coach

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती