विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाच्या मृत्युदरामध्ये घट नोंदवण्यात आली. सध्या राज्याच्या मृत्युदर एक टक्क्याच्या खाली असून, तो थेट ०.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. Death rate is lowest in state in last month
सध्या कोरोनाची लाट नियंत्रणात आली असून, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला दरदिवशी सरासरी पाच-चार हजारांच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दर दिवशी अनुक्रमे ५१२४ आणि सप्टेंबरमध्ये ४३१० रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, एप्रिल, मे, जून या तिन्ही महिन्यांत राज्याचा मृत्युदर जास्त होता. मात्र आता त्यात घट झाली असून, रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्युदरातही कमी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आधी दररोज ४६९० रुग्ण सापडत होते. तेव्हा १४६४ मृत्यू नोंदवण्यात आले, तर मृत्युदर एक टक्क्याच्यावर १.११ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या आठ महिन्यांपैकी एप्रिल, मे आणि जून या महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App