पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी अभिनेत्री गहनाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला


विशेष प्रतिनिधी

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी असलेल्या मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. गहनाच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. धाक दाखवून पीडित महिलांकडून अश्लील वर्तन करून घेतले आणि ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदशित केले, असा आरोप तिच्यावर आहे. High court rejects bail plea of Gehna

यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेमुळे तिने जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई पोलिसांनी तिच्या विरोधात भादंवि कलम ३७० (अश्लिलतेसाठी मानवी तस्करी) दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.ज्या महिलांनी याप्रकरणात तक्रार केली आहे, त्या करार करून स्वेच्छेने यामध्ये सहभागी झाल होत्या आणि त्यांनी व्हिडीओचे प्रमोशनही केले होते, असा युक्तिवाद गहनाच्या वतीने करण्यात आला; तर गहनाकडून आर्थिक व्यवहारांची आणि अन्य व्हिडीओबाबत माहिती हवी आहे. त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत जामीन नामंजूर केला.

High court rejects bail plea of Gehna

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात