विशेष प्रतिनिधी
मुंबई – रामायण मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे नामवंत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मुंबईमध्ये निधन झाले. त्यांचे वय 83 होते. रामायण या गाजलेल्या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते.Death of Arvind Trivedi Ravana in Ramayana
सदा हसतमुख असणारे अरविंद भाई एक मनस्वी व्यक्ती होते. टीव्ही मालिकेतील रावणाची भूमिका करताना संवादाद्वारे प्रभू श्री राम आणि सीता माईचा अनवधानाने का होईना पण आपल्याकडून अवमान झाल्याची गोष्ट त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत बोचत होती.
त्यासाठी ते दररोज सकाळी पुजा करताना राम-सीतेची माफी मागत असे सांगितले जाते. या संवेदनशील अभिनेत्याच्या निधनाने अवघी चित्रपटसृष्टी आणि मालिकेचे चाहते शोकाकुल झाले आहेत. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी झाला होता. मागील अनेक वर्षांपासून ते आजारी होते.
त्यांना तीन वर्षांपासून अधिक त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मुंबईतील कांदिवली परिसरातील घरात मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App