विशेष प्रतिनिधी
मुबंई : दररोज 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत वेतन न मिळणे आणि वेतन वाढीसाठी तसेच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Death fast of ST employees from 27th October
ऐन दिवाळसण तोंडावर आलेला असताना हा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच लोकांच्या प्रवासाची आभाळ होण्याची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संघटनेकडून आमरण उपोषणावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी ठेवली आहे. त्याचबरोबर वेळेत पगार मिळावा, हक्काचा डीए आणि एचआरए मिळावा या मागण्या देखील एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशनावर मोर्चा नेण्याचा इशारा अध्यक्ष संदीप शिंदे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
LIC Employee Strike : बँक कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आज LICचे कर्मचारी संपावर, हे आहे कारण…
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन तर करणारच पण एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर भीक मागायची पाळी आली आहे, कोरोना काळात राज्य बंद असताना 306 कर्मचाऱ्यांनी आहुती दिलेले आम्ही एस टी कामगार आहेत, आम्हाला वेळेत पगार मिळत नाही आणि पगारवाढही मिळत नाही अशी खंत यावेळी अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App