After the bank employees' strike, LIC's employees are on strike today

LIC Employee Strike : बँक कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आज LICचे कर्मचारी संपावर, हे आहे कारण…

2021-22च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याची घोषणा केली. याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि वित्तीय संस्थांमधील विक्रीतून 1.75 लाख कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिझनेस करणे हे सरकारचे काम नाही, असे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. After the bank employees’ strike, now LIC Employee Strike today


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2021-22च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याची घोषणा केली. याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि वित्तीय संस्थांमधील विक्रीतून 1.75 लाख कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिझनेस करणे हे सरकारचे काम नाही, असे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे.

1966 मध्ये भारत सरकारच्या मालकीच्या जीवन विमा महामंडळाची (एलआयसी) सुरुवात झाली. यात सुमारे 1,14,000 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये पॉलिसीधारकांची संख्या 29 कोटींपेक्षा जास्त आहे.

LIC कर्मचार्‍यांची मागणी..

LICचे कर्मचारी आणि अधिकारी 18 मार्च रोजी संपात सहभागी होतील. एआयआयसीएचे सरचिटणीस श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, प्रस्तावित निर्गुंतवणूक ही एलआयसीच्या खासगीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आयपीओमुळे मूळ उद्देशाचे उल्लंघन होईल.

एलआयसी कर्मचार्‍यांची मागणी आहे की, केंद्र सरकारने एलआयसीचा आयपीओ आणू नये. तसेच, पीएसयू आणि वित्तीय संस्थांमधील कोणतीही भागीदारी विकू नये.बँक कर्मचारीही दोन दिवस होते संपावर

यापूर्वी 15 आणि 16 मार्च रोजी बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर होते. यादरम्यान बँका बंद ठेवण्यात आल्या. 15 आणि 16 मार्च रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने देशभरातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात संपावर गेले. ज्यामध्ये 10 लाख बँक कर्मचारी सामील होते.्र

सरकारी कर्मचाऱ्यांनी चिंतेचे कारण नाही, अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र सरकार कर्मचार्‍यांची पूर्ण काळजी घेणार असल्याचे स्पष्ट केले. बँकेच्या कर्मचार्‍यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची सरकार काळजी घेणार आहे. निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्याकडे देशात अशा अनेक बँका आहेत ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. परंतु अशादेखील बँका आहेत, ज्यांची कामगिरी निराशाजनक आहे. आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाप्रमाणेच देशात आणखी एक बँक हवी आहे, जेणेकरून देशाची गरजा पूर्ण होऊ शकतील.

After the bank employees’ strike, now LIC Employee Strike today

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*