प्रतिनिधी
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च ठाकरे – शिंदे गर्दी खेचण्यात गर्क!!, अशी अवस्था खरंच दसऱ्यापूर्वी दोन दिवस आधी आली आहे. कारण शिवसेनेचे एका ऐवजी दोन दसरा मेळावे ठरवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाने एसटी गाड्या बुक करण्यावर भर दिला आहे. दोघांच्या मिळून तब्बल 4500 गाड्या मुंबईत येण्याची शक्यता आहे. पण एसटी गाड्यांच्या दोघांच्या बुकिंग मध्ये मात्र फार मोठी तफावत आहे!! Dasara Rallies : Thackeray – Shinde factions booked 4500 ST buses from all over maharashtra
दसरा मेळाव्याला ऐतिहासिक गर्दी जमवून प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटांनी केली आहे. त्यासाठी खासगी वाहनांसह रेल्वे बुकिंग करण्यात आल्या आहेत. शिवाय एसटी महामंडळाकडे प्रासंगिक करार म्हणून बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून 4100, तर ठाकरे गटाकडून 450 गाड्यांची मागणी आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतून प्रत्येकी 500 गाड्या रवाना करण्याचे शिंदे गटाचे नियोजन आहे. त्यासह एसटी महामंडळाकडे सर्व जिल्ह्यांतून 4100 एसटी गाड्या देण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.
सध्या एसटीकडे 15500 गाड्या आहेत. त्यातील 4000 गाड्या शिंदे गटाला दिल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आणि प्रासंगिक करार करण्यासाठी सुस्थितीत असलेल्या पुरेशा गाड्या उपलब्ध नसणे हीदेखील समस्या आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी मागणीनुसार गाड्या कशा उपलब्ध करून द्यायच्या, असाही प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा आहे.
‘एसटी’ मुख्यालयात गर्दी
एकट्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमधील सिल्लोड आगारप्रमुखांकडे 300 एसटी गाड्या आरक्षित करण्यासाठी अर्ज केला आहे. ठाण्याबरोबरच पालघर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव यासह अन्य भागांतून किती एसटी लागतील, याची माहितीही संबंधित आगारप्रमुखांना देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात येऊन मोठ्या प्रमाणात एसटी आरक्षित करण्याबाबत विचारणा केली जात असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App