Cruise Drugs Party Case : ड्रग्जप्रकरणी राष्ट्रवादीच्या गंभीर आरोपांना आता एनसीबीनेही दिले उत्तर, सर्व कायद्यानुसार झाले, वाटले तर त्यांनी कोर्टात जावे!

Cruise Drugs Party Case ncb Reply To ncp allegations that private persons Of bjp were involved During raid on cordelia cruise ship

ड्रग्जप्रकरणी क्रूझवरील छाप्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) बुधवारी आरोप केला की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील क्रूझवर टाकलेला छाप “बनावट” होता आणि त्यादरम्यान कोणतेही ड्रग्ज आढळले नाहीत. तपास संस्थेवर केलेल्या या आणि अशाच इतर गंभीर आरोपांवर आता एनसीबीने प्रत्युत्तर दिले आहे. Cruise Drugs Party Case ncb Reply To ncp allegations that private persons Of bjp were involved During raid on cordelia cruise ship


प्रतिनिधी

मुंबई : ड्रग्जप्रकरणी क्रूझवरील छाप्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) बुधवारी आरोप केला की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील क्रूझवर टाकलेला छाप “बनावट” होता आणि त्यादरम्यान कोणतेही ड्रग्ज आढळले नाहीत. तपास संस्थेवर केलेल्या या आणि अशाच इतर गंभीर आरोपांवर आता एनसीबीने प्रत्युत्तर दिले आहे.

एनसीबीचे स्पष्टीकरण

मुंबईत एनसीबीचे उपमहानिरीक्षक ज्ञानेश्वर सिंह यांनी राष्ट्रवादीच्या आरोपांवर म्हटले की, जर त्यांना (राष्ट्रवादी) न्यायालयात जायचे असेल तर ते जाऊन न्याय मागू शकतात. आम्ही तिथे उत्तर देऊ. आम्ही सर्व काही कायद्यानुसार केले आहे.

ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, एनसीबी मुंबईच्या टीमने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ग्रीन गेट मुंबई आणि कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला आणि कोकेन, चरस, एमडीएमए सारख्या ड्रग्जसह 8 जणांना ताब्यात घेतले होते.

“एनसीबीवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत आणि ते द्वेष आणि पूर्वग्रहाने दूषित असल्याचे दिसून येते. एनसीबी पुन्हा सांगते की आमचा तपास प्रोफेशनल आणि कायदेशीरदृष्ट्या पारदर्शक आणि निष्पक्ष आहे. तपास सुरू राहील.”

काय म्हणाले होते नवाब मलिक?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी छाप्याच्या वेळी एनसीबी टीमसह दोन जणांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, या व्यक्तींपैकी एक भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सदस्य होता.

का गाजले प्रकरण?

शनिवारी समुद्रातील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थ जप्त केले, यात एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 17 जणांना अटक केली आहे. शाहरुखच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यामुळे हे प्रकरण हायप्रोफाइल ठरले आहे.

पत्रकार परिषदेत मलिकांनी व्हिडिओ आणि फोटो दाखवले

नवाब मलिक यांनी काही व्हिडिओ आणि फोटोही जारी केले. राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले की व्हिडिओमध्ये आर्यन खान सोबत असलेली व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नाही आणि त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार तो क्वालालंपूरमध्ये राहणारा एक खासगी गुप्तहेर आहे. याव्यतिरिक्त आणखी एका व्हिडिओमध्ये, या प्रकरणात अटक केलेल्या अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दोन व्यक्ती दिसत आहेत आणि त्यापैकी एक भाजपचा सदस्य आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. मनीष भानुशाली असे त्याचे नाव असल्याचे ते म्हणाले.

मलिक म्हणाले, “जर हे दोघे NCB अधिकारी नाहीत, तर ते हाय प्रोफाइल लोकांना (आर्यन आणि मर्चंट) यांना का घेऊन जात होते.” मलिक म्हणाले, “भाजप संपूर्ण NCBचा वापर लोकांना, महाराष्ट्र सरकार आणि बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी करत आहे.” त्यांनी आरोप केला की, एनसीबी भाजपच्या विरोधात असलेल्यांना लक्ष्य करत आहे.

Cruise Drugs Party Case ncb Reply To ncp allegations that private persons Of bjp were involved During raid on cordelia cruise ship

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात