विशेष प्रतिनिधी
पुणे : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघाजणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्ज फेडण्यासाठी देणेकऱ्यांनी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करण्यास जात असल्याची चिठ्ठी लिहून पाषाणकर काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. त्यांना पोलिसांनी शोधून आणले होते.Crime against Pune businessman Gautam Pashankar, fraud under the pretext of selling flats
विजय पुरोहित, गौतम पाषाणकर आणि रिनल पाषाणकर (सर्व रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नरेंद्र पंडितराव पाटील (वय 42, रा. सिल्वर स्प्रिंग सोसायटी, पंचवटी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे प्रॉक्सीमा क्रिएशन सोसायटीमधील सी बिल्डिंगमध्ये असलेले दोन फ्लॅट त्यांना खरेदी करायचे होते. आरोपींनी या दोन्ही फ्लॅटची किंमत 2 कोटी 47 लाख रुपये किंमत ठरविली. त्यांच्यामध्ये याबाबत करारनामा देखील करण्यात आला. त्यांच्याकडून दोन कोटी 40 लाख रुपये घेण्यात आले.
परंतु, आरोपींनी त्यांना मिळकतीचा ताबा दिला नाही. तसेच नोंदणीकृत दस्त ही केला नाही. यातील एका सदनिकेचे खरेदीखत मनीषा गोरद यांच्या नावे तर दुसऱ्या सदनिकेचे खरेदीखत गणेश शिंदे यांच्या नावावर करून देण्यात आले.
याबाबत पाटील यांनी आरोपींना जाब विचारला. आरोपींनी त्यांना 8 जून 2020 रोजी जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ग्रुपच्या कार्यालयात बोलावून मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App