पाकिस्तानी सैनिकांचे भ्याड कृत्य, खलाशांच्या बोटीवर गोळीबार, एकाचा मृत्यू


पाकिस्तानी सैनिकांनी खलाशांच्य बोटीवर केलेल्या गोळीबारात एका खलाशाचा मृत्यू झाला. गालाला गोळी चाटून गेल्यावरही कॅप्टनने बोट चालवित सहा जणांचे प्राण वाचविले. Cowardly act of Pakistani soldiers, firing on a sailor’s boat, killing one


विशेष प्रतिनिधी

पालघर : पाकिस्तानी सैनिकांनी खलाशांच्य बोटीवर केलेल्या गोळीबारात एका खलाशाचा मृत्यू झाला. गालाला गोळी चाटून गेल्यावरही कॅप्टनने बोट चालवित सहा जणांचे प्राण वाचविले.

समुद्रात भारतीय सीमेजवळ पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारामध्ये मृत्यू पावलेल्या श्रीधर चामरे ह्या 32 वर्षीय तरुणावर त्याच्या वडराई ह्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नागरिकांनी पाकिस्तान सरकारचा निषेध व्यक्त केला. भाऊ बिजेच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पोरबंदर-ओखा येथून समुद्रात मासेमारीला गेलेल्या जलपरी बोटीतील 7 खलाशी कामगारांवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या अंदाधुंद फायरिंग मध्ये वडराई गावातील श्रीधर ह्याचा मृत्यू झाला होता.



36 वर्षीय बोटीचा कॅप्टन दिलीप यांच्या गालाला चाटून गोळी गेल्याने तो जखमी झाला होता.त्याही परिस्थितीत हार न मानता जीवावर उदार होत त्यांनी 6 लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळविले होते.6 नोव्हेंबर भाऊबीजेच्या दिवशी श्रीधर चा मृत्यू झाल्या नंतर तब्बल चार दिवसानी मंगळवारी पहाटे 3 वाजता त्याचा मृतदेह वडराई गावात आणण्यात आला.सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Cowardly act of Pakistani soldiers, firing on a sailor’s boat, killing one

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात