वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या एका व्यक्तीला हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे देशातील पहिले प्रकरण मुंबईत उघडकीस आले आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. Covid 19 Recovered Patient Diagnosed With Green Fungus Infection In Indore
३४ वर्षीय रुग्णाला काळ्या बुरशीची लागण झाल्याचा संशय आला. त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. तेव्हा त्याला हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशातील इंदूरमधील हा रुग्ण असून त्याला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणले होते. म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने त्याने चाचणी करून घेतली. तेव्हा त्याला हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.
श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा रुग्ण कोरोनातून बरा झाला होता. दरम्यान, म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचा संशय त्याला आला. यामुळे त्याने चाचणी केली. तेव्हा फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग असल्याचं निष्पन्न झालं.” दरम्यान, रुग्णाला मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App