दुखद : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर कोरोनाचा कहर ; आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू


भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.१५ दिवासांपूर्वी आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं आणखी पूर्णपणे पुसलीही गेली नसताना आता बहिणीचा कोरोनाने मृत्यू झालायं.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.१५ दिवासांपूर्वी वेदाच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दु:खात भर म्हणून आता वेदाच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झाला. आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती पूर्णतः खचून गेली आहे . केवळ १५ दिवसांत घरातील दोन जीवाभावाची माणसं कोरोनाने हिरावून नेली आहेत. Covid -19 : Indian Women Cricketer Veda Krushnamurthy lost her Mother And Sister

बहिणीचा कोरोनाने मृत्यू

वेदाची बहीण ४५ वर्षीय वत्सला यांचं निधन चिक्कमंगलुरुच्या एका खाजगी रुग्णालयात झालं. त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र उपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर त्यांची प्राणज्योत बुधवारी रात्री मालवली.

२४ एप्रिल रोजी आपली आई गेल्याचं तिने ट्विट करुन सांगितलं होतं. त्याचवेळी बहीणही कोरोनाने संक्रमित असल्याने तिची तब्येत खराब असल्याचं तिने म्हटलं होतं. त्या ट्विटला १५ दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. ६ मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमचं सोडून निघून गेल्याचं वेदाने सांगितलं.

वेदाला क्रिकेटर बनविण्यात बहिणीचा मोठा वाटा राहिला. तिच्या मुळगावी महिलांना क्रिकेटसाठी संधी नव्हत्या. अशावेळी बंगळुरुला येऊन वेदाला क्रिकेट अकादमीत टाकून तिच्यातील नेतृत्वगुणांना वत्सला यांनी हेरलं. पुढे वेदा भारतीय संघात खेळू लागली. वत्सला यांचं स्वप्न पूर्ण झालं. वेदाने आतापर्यंत ४५ एकदिवसीय आणि ७६ टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत.

आईशिवाय कुटुंबाची कल्पना !

“मी माझ्या आईला गमावलंय. आईच्या निधनानंतर तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. तिच्याविना कुटुंबाची मी आता कशी काय कल्पना करु? आता आम्ही बहिणीसाठी प्रार्थना करतोय. ती कोरोनाशी दोन हात करतीय. मी सध्या कोरोना निगेटीव्ह आली आहे. तुम्ही काळजी घ्या. माझ्या सहवेदना त्या लोकांसोबत आहेत जे अशा मुश्किल परिस्थितीतून जात आहेत”, अशा भावना तिने आई गेल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.

Covid -19 : Indian Women Cricketer Veda Krushnamurthy lost her Mother And Sister

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण