भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.१५ दिवासांपूर्वी आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं आणखी पूर्णपणे पुसलीही गेली नसताना आता बहिणीचा कोरोनाने मृत्यू झालायं.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.१५ दिवासांपूर्वी वेदाच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दु:खात भर म्हणून आता वेदाच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झाला. आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती पूर्णतः खचून गेली आहे . केवळ १५ दिवसांत घरातील दोन जीवाभावाची माणसं कोरोनाने हिरावून नेली आहेत. Covid -19 : Indian Women Cricketer Veda Krushnamurthy lost her Mother And Sister
बहिणीचा कोरोनाने मृत्यू
वेदाची बहीण ४५ वर्षीय वत्सला यांचं निधन चिक्कमंगलुरुच्या एका खाजगी रुग्णालयात झालं. त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र उपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर त्यांची प्राणज्योत बुधवारी रात्री मालवली.
It is with great sadness that last night my family had to say goodbye to My Akka My family, my world has been rocked to its core. Appreciate all the messages and prayers . My thoughts with everyone going through these devastating times. Hold your loved ones tight and stay safe 🙏 — Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) May 6, 2021
It is with great sadness that last night my family had to say goodbye to My Akka My family, my world has been rocked to its core. Appreciate all the messages and prayers . My thoughts with everyone going through these devastating times. Hold your loved ones tight and stay safe 🙏
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) May 6, 2021
२४ एप्रिल रोजी आपली आई गेल्याचं तिने ट्विट करुन सांगितलं होतं. त्याचवेळी बहीणही कोरोनाने संक्रमित असल्याने तिची तब्येत खराब असल्याचं तिने म्हटलं होतं. त्या ट्विटला १५ दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. ६ मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमचं सोडून निघून गेल्याचं वेदाने सांगितलं.
वेदाला क्रिकेटर बनविण्यात बहिणीचा मोठा वाटा राहिला. तिच्या मुळगावी महिलांना क्रिकेटसाठी संधी नव्हत्या. अशावेळी बंगळुरुला येऊन वेदाला क्रिकेट अकादमीत टाकून तिच्यातील नेतृत्वगुणांना वत्सला यांनी हेरलं. पुढे वेदा भारतीय संघात खेळू लागली. वत्सला यांचं स्वप्न पूर्ण झालं. वेदाने आतापर्यंत ४५ एकदिवसीय आणि ७६ टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत.
Appreciate all the messages I have received about the loss of my Amma. As you can imagine my family is lost without her. We now pray for my sister. I have tested negative & appreciate if you can respect our privacy. My thoughts & prayers go out to those going through the same!! — Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) April 24, 2021
Appreciate all the messages I have received about the loss of my Amma. As you can imagine my family is lost without her. We now pray for my sister. I have tested negative & appreciate if you can respect our privacy. My thoughts & prayers go out to those going through the same!!
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) April 24, 2021
आईशिवाय कुटुंबाची कल्पना !
“मी माझ्या आईला गमावलंय. आईच्या निधनानंतर तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. तिच्याविना कुटुंबाची मी आता कशी काय कल्पना करु? आता आम्ही बहिणीसाठी प्रार्थना करतोय. ती कोरोनाशी दोन हात करतीय. मी सध्या कोरोना निगेटीव्ह आली आहे. तुम्ही काळजी घ्या. माझ्या सहवेदना त्या लोकांसोबत आहेत जे अशा मुश्किल परिस्थितीतून जात आहेत”, अशा भावना तिने आई गेल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App