महाराष्ट्र, गोव्यातील न्यायालये आज बंद


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दिवंगत आत्म्यास आदरांजली म्हणून उच्च न्यायालयाने आज, 7 फेब्रुवारी रोजी सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर गोवा, दादरा, नगर हवेली आणि दीव, दमण आणि सिल्वासा राज्यातील अधीनस्थ न्यायालये सोमवार, 7 रोजी बंद राहतील. महाराष्ट्र राज्य सरकारनेही सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. Courts in Maharashtra, Goa closed today

आजच्या सुटी मुळे न झालेल्या कामकाजाची भविष्यात भरपाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील न्यायालयांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.



दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार दि. 7 रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येत आहे.

Courts in Maharashtra, Goa closed today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात