किरण गोसावीला कोर्टाने सुनावली 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार, फसवणुकीचे आरोप

2018च्या एका फसवणूक प्रकरणात न्यायालयाने किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूकप्रकरणी किरण गोसावी याला पोलिसांनी अटक केली होती. गोसावी हा मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा (NCB) स्वतंत्र साक्षीदारही आहे.Court sent Kiran Gosavi to police custody till November 8 in cruise drug case extortion


प्रतिनिधी

मुंबई : 2018च्या एका फसवणूक प्रकरणात न्यायालयाने किरण गोसावीला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूकप्रकरणी किरण गोसावी याला पोलिसांनी अटक केली होती. गोसावी हा मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा (NCB) स्वतंत्र साक्षीदारही आहे.

गोसावीला यापूर्वी पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. गेल्या आठवड्यात, पुणे पोलिसांनी 2018 च्या फसवणूक प्रकरणात किरण गोसावीला अटक केली. गोसावीविरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती,त्यानंतर तो फरार होता. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, त्यांनी 2018 च्या फसवणूक प्रकरणात गोसावीला पुण्यातील कात्रज भागातील एका लॉजमधून पहाटे 3 वाजता अटक केली होती.

असे आहे प्रकरण

किरण गोसावी यांनी केपीजी ड्रीमझ सोल्युशन्स नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने विविध क्षेत्रातील उमेदवारांना परदेशात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीने प्रमोशनसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. गोसावी यांच्यावर एका व्यक्तीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

मलेशियातील एका हॉटेलमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली गोसावीने ३.०९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता. पीडित तरुण मलेशियामध्ये पोहोचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले.

याप्रकरणी पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी एनसीबीचा साक्षीदार बनला होता

ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत सेल्फीमध्ये दिसल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीच्या छाप्यानंतर किरण गोसावी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

Court sent Kiran Gosavi to police custody till November 8 in cruise drug case extortion

महत्त्वाच्या बातम्या