वसईत बूस्टर डोस घेऊनही महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

डॉ भक्ती तळेकर या वसई विरार महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात कार्यरत आहेत. Coronavirus infection in female doctor despite taking booster dose in Vasai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती.दरम्यान त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.तसेच आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे.

बूस्टर डोस घेतल्या नंतरही वसईत डॉक्टर महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.डॉ भक्ती तळेकर असे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचे नाव आहे.वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी माहिती दिली आहे.डॉ भक्ती तळेकर या वसई विरार महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात कार्यरत आहेत.



10 जानेवारी रोजी त्यांनी बूस्टर डोस घेतला होता.दरम्यान डोस घेतल्यानंतर 14 जानेवारीला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान त्यांना सर्दी, ताप,अंगदुखीची लक्षण जाणावल्याने त्यांनी कोरोना रिपोर्ट केला होता.सध्या त्या त्यांच्या राहत्या घरी होम आयसोलेशन मध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Coronavirus infection in female doctor despite taking booster dose in Vasai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात