कोरोना पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यांवर आल्याने मुंबईकरांना मिळाला दिलासा


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पॉझिटिव्हिटी दर १ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत कोरोना आता आटोक्यात येत असून २३ वॉर्डमधील रुग्ण दुपटीचा कालावधी एक हजार दिवसांच्या पुढे गेला आहे.Corona positivity rate decresed in mumbai

एकीकडे मुंबईत दिलासादायक परिस्थिती असली तरी मृत्युदर मात्र ३ टक्क्यांच्या वर आहे. जागतिक मृत्युदर २.१४ टक्के आहे. देशाचा मृत्युदर १.३४ टक्के; तर राज्याचा मृत्युदर २.११ टक्क्यांवर आहे.मुंबईचा रुग्णदुपटीचा दर १४५८ दिवस झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णदुपटीचा कालावधी ‘बी’ प्रभाग म्हणजेच सँडहर्स्ट रोडमध्ये ३,८०९ दिवस; तर सर्वांत कमी रुग्णदुपटीचा कालावधी ‘डी’ प्रभाग कुलाबा-फोर्ट ९८२ दिवस आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असताना मुंबईतील कोरोना स्थिती सुधारल्याने दिलासा मिळाला आहे.

रविवारी दिवसभरात १० मृत्यूंची नोंद झाली. बाधित रुग्णांसह मुंबईतील मृतांचा आकडाही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला, तरी सध्याचा मृत्युदर संपूर्ण जगातील मृत्युदराच्या तुलनेत अधिक आहे.

Corona positivity rate decresed in mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण