कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांनीही पुढाकार घ्यावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून एक अनोखी स्पर्धा घोषित केली आहे.Corona-free village now announced 50 lakh prize, a unique one from Pune district
विशेष प्रतिनिधी
पुणे : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.दरम्यान जिल्ह्यात दररोज पाच हजारहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांनीही पुढाकार घ्यावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून एक अनोखी स्पर्धा घोषित केली आहे.
तसेच गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे.विशेष म्हणजे कोरोनामुक्त गावांना जिल्हा परिषदेकडून बक्षीस देण्यात येणार आहे.दरम्यान यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 10 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की , गाव, तालुका, आणि जिल्हा कोरोनामुक्त व्हावे यासाठी ही कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे, अशी माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App