आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादात वाद; संभाजीनगर दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची!!

प्रतिनिधी

संभाजीनगर : शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा घेत आहेत. या यात्रेदरम्यान, ते सध्या संभाजीनगर दौ-यावर आहेत. पैठण येथील मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. Controversy in Aditya Thackeray’s Shiv Samvad

आदित्य ठाकरे तेथे दाखल होताच शिवसैनिकांनी एकच गोंधळ सुरु केला. या गर्दीतून मार्ग काढत असताना, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यकर्त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवरही कार्यकर्ते भडकले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला.



संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला

संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने, संभाजीनगर शिवसेनेला तडा गेला. औरंगाबाद दौ-याआधी आदित्य ठाकरे हे नाशिक, ठाणे, भिवंडी येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.

तसेच, आदित्य ठाकरे शुक्रवारी वैजापूर, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला तर शनिवारी, पैठण, गंगापूरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण मतदार संघात हा प्रकार घडला.

Controversy in Aditya Thackeray’s Shiv Samvad

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात