खुर्ची तुझी का माझी?? : नागपूरच्या वज्रमूठ सभेआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची रेस ओपन; काँग्रेसची हॅट रिंग मध्ये!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नागपुरात उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधीच आघाडीतील मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन झाली आहे. नागपूरला होणारी वज्रमूठ सभा हे महाविकास आघाडीचे दुसरे शक्तिप्रदर्शन आहे. पण या शक्तिप्रदर्शना आधीच आघाडीतल्या मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन झाल्याने महाविकास आघाडीतले तीन घटक पक्ष एकत्र येऊन भाजपशी लढणार की मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये जिंकण्यासाठी आपापले आमदार जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी एकमेकांमध्येच लढणार??, असा सवाल तयार झाला आहे.Congress state president nana patole open the race for chief ministership in MVA before nagpur vajramooth sabha

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझा कट्टावर दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन असल्याचे अप्रत्यक्ष विधान केले. महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. याखेरीज कॉमन मिनिमम प्रोग्रॅम नुसारच कार्यक्रम राबवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या वज्रमुठीत आधीच ढिलाई आली असताना नानांनी मुख्यमंत्री पदाची रेस काँग्रेसने ओपन केल्यामुळे नागपूरच्या सभेत वज्रमूठ आवळणार की आणखी ढिल्ली पडणार??, असा सवाल तयार झाला आहे.



विदर्भ काँग्रेसमध्ये मतभेद

वज्रमूठ सभेआधी तशीही काँग्रेसमधली अंतर्गत वज्रमूठ ढिल्ली पडलीच आहे. वज्रमूठ सभेला नितीन राऊत येणार की नाही??, सभेच्या तयारीसाठी सतीश चतुर्वेदी यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले नाही, माजी खासदार विलास मुद्देवार आणि विजय वडेट्टीवार जास्त ऍक्टिव्ह दिसले, अशा बातम्या आधीच प्रसार माध्यमांनी दिले आहेत. या बातम्यांमध्ये उल्लेख केलेले सगळे नेते हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी वजरमूठ आवळण्यापूर्वीच काँग्रेसचेच अंतर्गत वज्रमूठ ढिल्ली पडल्याचेच ते निदर्शक आहे.

उद्धव ठाकरे वडेट्टीवार कन्येला दम देणार?

त्यातच विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी टाकली आहे. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत खुद्द राहुल गांधींना सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा दम भरला होता. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या राहुल गांधी थोडे बॅकफूटवर गेलेले दिसले. पण त्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे वडेट्टीवार कन्येला दम देणार का आणि तो दम काँग्रेस ऐकणार का??, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या पेचात

पण त्याचबरोबर काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची रेस ओपन करून उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवा राजकीय पेच टाकला आहे. उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजी नगरच्या वज्रमूठ सभेत विशिष्ट वेगळी खुर्ची देण्यात आली होती. तशीच खुर्ची नागपूरच्या सभेत देऊन त्यांच्या नेतृत्वाखालीच महाविकास आघाडी लढणार का??, हा प्रश्न नाना पटोले यांना विचारल्यानंतर उद्धव ठाकरेंना जशी विशेष खुर्ची देण्यात येईल, तशाच खुर्च्या बाकीच्या नेत्यांसाठी मांडण्यात येतील, असे स्पष्ट करून उद्धव ठाकरेंचा दर्जा महाविकास आघाडीत बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशी समान असल्याचेच त्यांनी स्पष्ट करून टाकले आहे.

Congress state president nana patole open the race for chief ministership in MVA before nagpur vajramooth sabha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात