रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी ; पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांचा पत्ता कट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं  रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागी काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्याना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील आणि परराज्यातील मंडळींच्या पदरी सुद्धा निराशा आली. राज्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. पण, रजनी पाटील यांचे भाग्य फळालेले आहे. Congress nominates Rajni Patil for Rajya Sabha; Cut the address of many including Prithviraj Chavan

महाराष्ट्रातून एकमेव राज्यसभेची जागा होती. त्यावर अनेक मंडळींनी डोळे ठेवले होते. अखेर सोनिया गांधींकडून पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. रजनी पाटील या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सुद्धा त्यांचे नाव होतं. पण त्याऐवजी राज्यसभेवर संधी दिली आहे.

सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू

रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत. महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर  ४ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Congress nominates Rajni Patil for Rajya Sabha; Cut the address of many including Prithviraj Chavan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात