Rajeev Satav Death : राहुल गांधींचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव, चार वेळा पटकावला होता संसदरत्न पुरस्कार

Congress MP Rajeev Satav Death Due to Covid 19 in Pune, Know About His Political career

Rajeev Satav Death : काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राजीव सातव उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला आहे. Congress MP Rajeev Satav Death Due to Covid 19 in Pune, Know About His Political career


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनाची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राजीव सातव उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनावर अनेक दिग्गज नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला आहे.

19 एप्रिलपासून लक्षणे जाणवू लागल्यानंतर 22 एप्रिल रोजी राजीव सातव यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात 23 एप्रिलपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनातून बरे झाल्याचीही माहिती मध्यंतरी आली होती. परंतु त्यांना सायटोमॅगलो या नव्या विषाणूच्या संसर्गानंतर प्रकृतीची गुंतागुंत वाढली. राजीव सातव यांच्यावर उपचारांसाठी मुंबई-पुण्यातील मोठमोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तथापि, रविवारी उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाआहे. सातव कुटुंबींयाप्रति त्यांनी आपल्या संवदेना ट्वीटद्वारे व्यक्त केल्या.

 

राजीव सातव यांचा जीवनप्रवास

21 सप्टेंबर 1974 रोजी राजीव सातव यांचा जन्म झाला होता. त्यांच्या मातोश्री रजनी सातव याही काँग्रेसच्या आमदार होत्या.

काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आणि राहुल गांधींचे अत्यंत जवळचे म्हणूनही त्यांना ओळखले जायचे.

राजीव सातव यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी पद आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक पदही भूषवले.

2014 मध्ये राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना पराभूत केले होते.

2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकांत राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं.

राजीव सातव यांची संसदेत 81 टक्के हजेरी होती, जी राष्ट्रीय दरापेक्षा जास्त होती. उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार राजीव सातव यांनी चार वेळा पटकावला होता. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यांसारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना ससंदेत आवाज दिला.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. तरुण खासदाराच्या अकाली एक्झिटमुळे अनेक दिग्गज राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Congress MP Rajeev Satav Death Due to Covid 19 in Pune, Know About His Political career

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात