प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना जाहीर कार्यक्रमात तलवार नाचवणे महागात पडले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Congress ministers Varsha Gaikwad and Aslam Sheikh had to pay dearly for their swords; Crime filed
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांना जाहीररित्या तलवारी नाचवल्या. म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.
वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख या दोन मंत्र्यांनी या दोघांनी जाहीर कार्यक्रमात तलवार नाचवली म्हणून भाजपचे नेते मोहित कंबोज (भारतीय) यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कंबोज यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होता
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर भाजप कार्यकर्ते जेव्हा मोहित कंबोज यांच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी तलवार नाचवली होती, त्यावेळी त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांनीही तलवार नाचवली होती. त्यामुळे यांच्याविरोधात कंबोज यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली. यासंबंधी त्यांनी ट्विट केले आहे.
काय म्हणाले मोहित कंबोज?
खरे तर मुंबई पोलिसांनी स्वतःहून मंत्री वर्षा गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी त्याप्रमाणे तात्काळ कारवाई केली नाही. म्हणून आपण याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. देर आये दुरुस्त आये, अशी स्थिती आहे, असे मोहित कंबोज म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App