पुन्हा एकदा नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत असून, या भरती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.Congratulations Mr. Tope; While filling the form, Nagpur will be tested in Thane in the morning and Washim Kendra in the afternoon.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर नावांच्या चुका, पत्त्याच्या चुका अशा अनेक चुका झाल्या. त्यानंतर ज्या दिवशी परीक्षा होती.त्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्यात येत आहे अशी घोषणा केली.
आता पुन्हा एकदा नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत असून, या भरती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील हजारो परीक्षार्थींनी आक्रोश केला.मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे.
अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. उलट एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचं समोर येतंय. यामुळे या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित राहिलाय.
चंद्रपूरमधील परीक्षार्थी नितेश दडमल मुलाखतीत म्हणाला की , “मी चंद्रपुर जिल्हातील रहिवासी आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे मी ठाण्याला एवढ्या लांब जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. २५ सप्टेंबर २०२१ रोजीची पुढे गेलेल्या परीक्षेला मला दोन्ही पदांकरीता नागपूर केंद्रच मिळाले होते. शासनास माझी हीच नम्र विनंती आहे की यावेळी सुद्धा परीक्षा फार्म भरताना मी जे नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं, तिथेच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावं.” तसेच मी परीक्षेपासून वंचित राहिल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्याने दिलाय.
दरम्यान नितेश दडमल याने ट्विटरवर आपला प्रश्न मांडत थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सवाल केलाय. त्याचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात शेअर होतंय. तसेच अनेक इतर परीक्षार्थी या ट्वीटवर आपली मतं मांडत आहेत. नितेश म्हणाला, “आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्याबद्दल टोपे साहेब अभिनंदन. अर्ज भरताना तर मी नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं.परंतु आता परीक्षेला सकाळच्या सत्रात ठाणे आणि दुपारच्या सत्रात वाशिम परीक्षा केंद्र दिलंय. आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.”
अभिनंदन टोपे साहेब.पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्या बद्दल.फार्म भरतांना तर नागपुर परीक्षा केंद्र निवडला असतांना – सकाळच्या सत्राचा ठाणे & दुपारच्या सत्राचा वासिम परीक्षा केंद्र दिल्याबद्दल.#arogyabhartधिक्कार असो या सरकारचा.@AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @NANA_PATOLE pic.twitter.com/72DN1BEN0x — Nitesh Dadmal (@dadmal_nitesh) October 15, 2021
अभिनंदन टोपे साहेब.पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्या बद्दल.फार्म भरतांना तर नागपुर परीक्षा केंद्र निवडला असतांना – सकाळच्या सत्राचा ठाणे & दुपारच्या सत्राचा वासिम परीक्षा केंद्र दिल्याबद्दल.#arogyabhartधिक्कार असो या सरकारचा.@AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @NANA_PATOLE pic.twitter.com/72DN1BEN0x
— Nitesh Dadmal (@dadmal_nitesh) October 15, 2021
आरोग्य विभागाच्या भरतीचे काम न्यासा कंपनीला दिलेले आहे. या कंपनीच्या गोंधळामुळे दोन वेळा आरोग्य खात्याने परीक्षा पुढे ढकलली. गेल्या वेळी तर आयत्या वेळीच परीक्षा पुढे ढकलली. तरीही कंपनीला तब्बल एक महिना देण्यात आला; मात्र कंपनीचा सावळा गोंधळ अद्याप संपलेला दिसत नाही. गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोबर, तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. त्यापैकी २४ ऑक्टोबरचे प्रवेशपत्र उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यामध्ये सेंटर बदलल्याने उमेदवार बुचकळ्यात पडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App