ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उमरीकरांविरोधात शिवसैनिकांच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी; 85 वर्षांच्या वडिलांना घरी जाऊन धमक्या


प्रतिनिधी

औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उमरीकरांना शिवसैनिकांनी धमक्या दिल्या आहेत. श्रीकांत उमरीकर यांनी सोशल मीडियातून शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय भूमिकेविरोधात लिखाण आणि व्हिडिओद्वारे सादरीकरण केल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.

या बाबतची बातमी सामना दैनिकाने दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या 85 वर्षांच्या वडिलांना देखील शिवसैनिकांनी घरी जाऊन धमक्या दिल्या आहेत. या यासंदर्भात श्रीकांत उमरीकर यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.Complaint against senior journalist Shrikant Umarikar at Shiv Sainik police station

श्रीकांत उमरीकर यांची भूमिका अशी :

माझ्या विरूद्ध शिवसैनिकांनी विविध पोलीस स्टेशनांत तक्रारी दाखल केल्यात. काल मी सापडलो नाही तर माझ्या ८५ वर्षे वयाच्या वृद्ध वडिलांना घरी येवून धमक्या दिल्या. मला हा विषय वाढवायचा नव्हता म्हणुन शांत राहिलो. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली नाही. पण आता सामनाने भडक बातमी देवुन प्रकरण चव्हाट्यावर आणले आहे. म्हणुन मी पण माझी भुमिका जाहिर मांडतो. भ्रष्ट निकम्म्या राज्यकर्त्यां विरोधात आवाज उठवल्या शिवाय मी शांत बसणार नाही.

कुठल्याही कायदेशीर कार्रवाईला तोंड देण्याची माझी तयारी आहे. कालच उस्मानपुरा पोलीस स्टेशनात पोलीस अधिकार्‍यांना वकिलाला सोबत घेवून भेटून आलो आहे. मी सर्वसामान्य जनतेची भावनाच माझ्या “उसंतवाणी” मधुन मांडतो आहे. आणि ती मांडतच राहिल. माझ्या घरी येवुन धमकी दिल्याने मी घाबरणारा नाही. मी सुखरूप आहे. काळजी नसावी. अनोळखी मो.न. वरचे फोन सध्या स्विकारत नाहीये. धमक्यांचे फोन block करतो आहे. कुण्या हितचिंतकाने अनोळखी नं. वरून फोन केल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

Complaint against senior journalist Shrikant Umarikar at Shiv Sainik police station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण