बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला.कारण आमदार भास्कर जाधव हे बस चालवत हाेते.Chiplun: MLA Bhaskar Jadhav drove the bus
विशेष प्रतिनिधी
चिपळूण : आमदार भास्कर जाधव हे कधी शेतात नांगरणी करताना दिसतात तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना , तर कधी ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसतात.पण आज चक्क आमदार भास्कर जाधव बस चालविताना चिपळूणकरांना दिसले.
चिपळूण महामार्गावरील एका कार्यालयातून एक नवी काेरी बस बाहेर पडली.दरम्यान बसच्या चालकाच्या जागी बसलेल्या व्यक्तीला पाहून अनेकांना धक्काच बसला.कारण आमदार भास्कर जाधव हे बस चालवत हाेते. हे सारे पाहिल्यानंतर सारेच अवाक् झाले.
VIDEO: 'शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट'; भास्कर जाधवांनी चालवली बस pic.twitter.com/HfpXaBvzNi — Lokmat (@lokmat) January 11, 2022
VIDEO: 'शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट'; भास्कर जाधवांनी चालवली बस pic.twitter.com/HfpXaBvzNi
— Lokmat (@lokmat) January 11, 2022
भास्कर जाधव यांच्या एका कार्यकर्त्याने व्यवसायासाठी ही बस आणली हाेती.दरम्यान ताे मित्र बस घेऊन थेट भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आला.भास्कर जाधव यांनी श्रीफळ वाढविले आणि गाडीला हार घातला.
दरम्यान त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती धरले.तसेच चिपळुणातून फेरफटका मारुन ते पुन्हा कार्यालयाजवळ आले. अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविताना पाहून अनेकांनी तर ‘शेठ, तुमचे ड्रायव्हिंगही आहे ग्रेट’, अशी उपमाही देऊन टाकली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App