Gangster Prasad Pujari : कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी चीनने दिली मंजूरी

Arrest new

मुंबई, ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांची होणार उकल; २०१० मध्ये  मुंबईतून चीनला पळाला होता. 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी चीनने हिरवा कंदील दर्शवला असून, लवकरच तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. यामुळे मुंबईसह ठाण्यात त्याच्याविरोधातील अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. २०१० मध्ये प्रसाद पुजारी मुंबईतून चीनला पळाला होता. China approves extradition of gangster Prasad Pujari

मुंबई पोलिसांनी चीनला प्रसाद पुजारीची माहिती दिली होती. गेल्या महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी त्याला हाँगकाँगमध्ये अटक केली होती. तो शेन्झेन विमानतळावरून कुठेतरी जात असल्याची खबर इंटरपोलला मिळाली आणि पोलिसांनी त्याला विमानतळावरच पकडले. त्याच्यावर बनावट पासपोर्टवर प्रवास केल्याचा आरोप होता. गेल्या एक महिन्यापासून तो चीनमध्ये बंद आहे.

या गुंडाला भारतात परत करण्याची मागणी भारताने चीनकडे केली होती आणि आता चीनने ही मागणी मान्य केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित कागदपत्रे भारतात पाठवली असून आता मुंबई पोलीस ही कागदपत्रे पूर्ण करून त्याला लवकरात लवकर भारतात आणतील.


Delhi Liquor Scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, १७ एप्रिलपर्यंत तुरुंगातच असणार मुक्काम!


२००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनचा व्हिसा मिळाला ज्याची मुदत २०१२ मध्ये संपली होती, पण तरीही तो तिथे लपून राहिला. चीनमध्ये बसून तो भारतात आपले नेटवर्किंग वाढवत होता. २०१९ मध्ये प्रसादवर शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप होता. १९ डिसेंबर २०१९ रोजी जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता, ज्यात ते थोडक्यात बचावले होते.

China approves extradition of gangster Prasad Pujari

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात