विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंगार विसरलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भंगाराचे कौतुक करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांचे गुड गोर्इंग म्हणत कौतुक केले होते.Chief Minister Uddhav Thackeray praises scrap , criticizes Atul Bhatkhalkar
क्रूझ ड्रग्स पार्टी अथवा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही गंभीर आरोप केले आहेत.
यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.यासंदर्भात, आमदार भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.
कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भंगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App