छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार; पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित


वृत्तसंस्था

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी ताराराणी यांच्यावर पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.Chhatrapati Tararani’s heroic story across the ocean; The first Marathi Hollywood movie will be released next year

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी , असे ‘सिनेमाचे नाव आहे. २०२२ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य अबाधित ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. सोनाली कुलकर्णी या छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करून मराठी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर केले आहे. ताराराणीने मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरुद्ध निकराचा लढा दिला होता. अशा या महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा सिनेमाआहे.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे तर राहुल जनार्दन जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे. औरंगजेबसारख्या क्रूर आणि निष्ठूर राज्यकर्त्याला यमसदनी पाठवणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “मराठी चित्रपटांना अधिक दर्जेदार बनवण्याचा प्लॅनेट मराठीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी, या दृष्टीने आमचा कायम प्रयत्न असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असूनही छत्रपती ताराराणींबद्दल लोकांना इतकी माहिती नाही. त्यांचे धाडस आणि शौर्य असामान्य आहे. त्यांची ही वीरगाथा लोकांसमोर आणण्याचा ‘प्लॅनेट मराठी’चा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापार संपूर्ण जगाला कळावा, यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे”.

युनायटेडकिंगडम मधील नावाजलेली ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ’ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ हे या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबीदेखील लंडनमध्येच होणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोचणारआहे. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

Chhatrapati Tararani’s heroic story across the ocean; The first Marathi Hollywood movie will be released next year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात