वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटुन अपघात झाला. त्यामुळे २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत हा अपघात झाला आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर उलटल्याने ही वाहतूक कोंडी झाली. chemical tanker overturned on Mumbai-Pune Express Way ;Long queues of vehicles on the highway
केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गिकांपैकी एका मार्गिकेवर टँकर उलटल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. आय. आर. बी. यंत्रणा, बोरघाट वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App