वृत्तसंस्था
नागपूर : विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. Chandrapur third hottest place in world
मंगळवारी नोंदलेल्या तापमानानुसार, चंद्रपूर हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. काल सकाळपासूनच चंद्रपुरात उन्हाचा चटका वाढला होता. रात्री देखील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी मालीतील कायेस शहर हे पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा ४४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मालीतील सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. येथील तापमान ४३.८ अंश नोंदलं आहे. त्यानंतर भारतातील चंद्रपूर पृथ्वीतलावरील तिसरं सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहरांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला हे शहर सातव्या क्रमांकावर असून मंगळवारी येथील तापमान ४३.१ अंश सेल्सिअस एवढं नोंदलं आहे. तर भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरं अनुक्रमे ४३.१ अंश सेल्सिअस आणि ४३ अंश सेल्सिअससह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App