सामान्यांसाठी किमान ३००० कोटींचे पॅकेज द्या, मग लॉकडाऊन जाहीर करा; भाजपची भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली

विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रात कोविडची साखळी तोडायला लॉकडाऊन आवश्यक असेल. पण लॉकडाऊन जाहीर करण्याआधी सर्वसामान्य घटकांसाठी किमान ३००० कोटी रूपयांचे पॅकेज द्या आणि मग लॉकडाऊन करा, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली आहे. chandrakantdada patil demands 3000 cr pakage for comman people in maharashtra before lockdown

‘मुंबईत सुशोभिकरणाच्या नावाखाली पैसे उडवायला, मुलाची हौस भागवायला मुख्यमंत्र्यांकडे पैसे आहेत, आमदार निधीत वाढ करायला पैसे आहेत, मग हातावरचे पोट असलेल्या लोकांना पॅकेज द्यायला पैसे नाहीत का?’, असा सवाल चंद्रकांतदादांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.लसीकरणाबाबत ठाकरे – पवार सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करताना चंद्रकांतदादा म्हणाले, केंद्राने राज्याला भरपूर लस उपलब्ध करून दिली पण लसीकरण व्यवस्थित झाले नाही. अनावश्यक लोकांना लस दिली गेली. यामध्ये काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाला. एका मोठ्या कंपनीत सरसकट सर्वांना लस दिली. वय पाहिले नाही. अनेक ठिकाणी नातेवाईकांना लस दिली. यामुळे राज्यात लस व्यवस्थित वितरित न झाल्यानेच तुटवडा भासत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लॉकडाऊन आवश्यक असेल, पण सर्वसामान्य घटक असलेल्या ५० लाख लोकांना तीन हजार कोटींचे पॅकेज दिल्याशिवाय तो जाहीर करायला आमचा विरोध राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक निर्बंध, लॉकडाऊन करणे आवश्यक वाटत आहे. पण, घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे. यामुळे प्रथम लॉकडाऊनचा फटका ज्यांना ज्यांना बसू शकतो, त्या सर्वांना पॅकेज देणे आवश्यक आहे.

पैसे नाहीत म्हणत रडगाणे गाण्याची ही वेळ नाही, असे सांगून ते म्हणाले, आमदारांचा विकास निधी वाढवला. त्यासाठी सातशे कोटी सरकारकडे आहेत. मुंबईत नगरसेवकांना जवळजवळ तीन हजार कोटींचा सुशोभिकरणासाठी निधी देण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. यामुळे मुलाची हौस भागवायला मुख्यमंत्र्यांकडे पैसे आहेत, मग सर्वसामान्य लोकांना पॅकेज द्यायला पैसे नाहीत असे म्हणता कामा नये. त्यांना ते पॅकेज दिल्याशिवाय लॉकडाऊन जाहीर करण्यास आमचा विरोध राहील.’

chandrakantdada patil demands 3000 cr pakage for comman people in maharashtra before lockdown


हे ही वाचा