थोडी जरी लाज असेल तर केंद्राच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्व दाखवा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

थोडी जरी लाज या सरकारच्या मनात शिल्लक असेल तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा.भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात, तर थोडे तरी स्वकर्तृत्त्व दाखवा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. If you are a little embarrassed, show your mettle instead of breaking your fingers in the name of the center Chandrakant Patil’s Challenge


विशेष प्रतिनिधी

मुंबई : थोडी जरी लाज या सरकारच्या मनात शिल्लक असेल तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा.भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात, तर थोडे तरी स्वकर्तृत्त्व दाखवा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत केंद्राने मराठा आरक्षणाला थेट पाठिंबा दर्शवणारा दावा केला आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी सर्वांत मोठी अडचण ठरणारी 50 टक्के आरक्षण मयार्दाच योग्य नसल्याचा दावा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. महाराष्ट्र राज्याने दिलेलं मराठा आरक्षण संविधानिक असल्याचं केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.यावरून पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला, अशा शब्दात मागील सरकारची कामगिरी दाखवत, स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे.

पाटील म्हणाले,तुम्ही फसवणुकीने सत्तेवर आला आहात, मग आलाच आहात तर स्वकर्तृत्वही दाखवा. राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीयार्ने न पाहणाºया महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरील सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना तुषार मेहता यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण घटनेत बसणारं असल्याचा दावा केला. घटनेच्या 102 व्या कलमात राज्याला असं आरक्षण देणारा कायदा करण्याचा अधिकार आहे.

If you are a little embarrassed, show your mettle instead of breaking your fingers in the name of the center Chandrakant Patil’s Challenge

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*