Chandigarh police Issued Summons Salman Khan : चंदिगडमधील एका व्यावसायिकाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान, त्यांची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि त्यांची कंपनी बीइंग ह्युमनच्या सीईओ व इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. व्यावसायिकाने 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. Chandigarh police Issued Summons Salman Khan and sister Alvira For fraud case of Being Humen Jewellery shop
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : चंदिगडमधील एका व्यावसायिकाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान, त्यांची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि त्यांची कंपनी बीइंग ह्युमनच्या सीईओ व इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. व्यावसायिकाने 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
व्यावसायिक अरुण गुप्ता यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बीइंग ह्यूमन कंपनीने चंदिगडच्या मनिमाजरा येथे त्यांना तीन कोटी रुपये खर्च करून शोरूम उघडायला लावले. नंतर माल त्यांच्याकडे पाठविलाच नाही आणि कंपनीची वेबसाइटदेखील बर्याच दिवसांपासून बंद आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या कोणत्याही तक्रारीला कंपनीने प्रतिसाद दिला नाही.
बीइंग ह्युमबरोबर लेखी करार केल्याचा दावाही त्यांनी केला. तक्रारीत अरुण गुप्ता यांनी सांगितले की, बीइंग ह्यूमनचा ज्वेलरी ब्रँड स्टाइल क्विंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत आहे आणि त्यांच्या शोरूममधील सर्व उत्पादनेही बीइंग ह्यूमन कंपनीची आहेत.
अरुण गुप्ता यांनी 2018 मध्ये हे शोरूम उघडले होते. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अरुण गुप्ता यांनी सलमान खानच्या बिग बॉसचा व्हिडिओही दिला आहे. ज्यामध्ये सलमान स्वत: चंदिगडमध्ये बीइंग ह्युमन ज्वेलरी शोरूम उघडल्याचे सांगताना दिसत आहे. त्याने आपल्या कुटुंबासमवेत सलमान खानची छायाचित्रेदेखील दिली आहेत आणि म्हटले की, केवळ सलमानच्या भरवशावरच त्याने या व्यवसायात एवढी मोठी गुंतवणूक केली आहे.
त्याने सांगितले की, स्वत: सलमान खानला शोरूमच्या ओपनिंगला यायचे होते पण बिझी शेड्युलमुळे तो येऊ शकला नाही. त्याचा मेहुणा आयुष शर्माला त्याच्या जागी ओपनिंगला पाठवले. बीइंग ह्यूमन ज्वेलरी ब्रँडचे संपूर्ण कामकाज असणार्या कंपनीने आपली सर्व कार्यालये आणि वेबसाइट बंद केल्याचा आरोप अरुण यांनी केला आहे. कंपनीने दागिन्यांच्या सर्व वस्तू देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप तसे झाले नाही.
याप्रकरणी पोलिसांनी समन्स बजावले आहे. चंदिगडचे एसपी सिटी केतन बन्सल यांनी सांगितले की, सलमान खान, त्याची बहीण अलवीरा यांच्यासह बीइंग ह्यूमन अँड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना समन्स पाठविण्यात आले असून त्यांना 13 जुलैला हजर राहून उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यांचा जबाब न मिळाल्यास किंवा पोलीस समाधानी नसल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
Chandigarh police Issued Summons Salman Khan and sister Alvira For fraud case of Being Humen Jewellery shop
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App