प्रतिनिधी
मुंबई : दिलखुलास मुलाखतीमध्ये देखील राजकीय नेते विद्यमान राजकीय परिस्थितीचे भान कसे विसरत नाहीत आणि आपल्याला हवे ते साध्य करून घेण्यासाठी कसे जागरूक असतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीचे शिवसेनेचे आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ छगन भुजबळ. त्यांनी लोकसत्ताला दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत एका प्रश्नावर असे उत्तर दिले, की त्यामुळे त्यांचे विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत किती चांगले भान आहे आणि आपल्याला हवे ते साध्य करून घेण्यासाठी ते कसे जागरूक आहेत, हेच दिसून आले!! Chagan Bhujbal said, he likes sharadrao Thackeray!!
छगन भुजबळांना तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये कोण आवडतात??, असा प्रश्न मुलाखतकर्त्याने विचारला. त्यावर छगन भुजबळ उत्तरले, की बाळासाहेब ठाकरे माझ्या हृदयात आहेत आणि शरद पवार माझ्या शरीराच्या कणाकणात आहेत. त्यामुळे मला नेमके कोण आवडतात हे सांगता येत नाही. पण मला शरदराव ठाकरे आवडतात!!, असे मिष्कील उत्तर देऊन छगन भुजबळ यांनी विद्यमान महाविकास आघाडी टिकवण्याचेच क्लुप्ती लढवली.
बाकीच्या प्रश्नांवर देखील छगन भुजबळ यांनी अशीच टोलेबाजी केली. समीर आणि पंकज भुजबळ हे तर आपले राजकीय वारसदार आहेतच, पण त्यापलिकडे महात्मा फुले समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे देखील आपले राजकीय वारसदार आहेत, असे भुजबळ यांनी सांगून आपला राजकीय हेतू देखील साध्य करून घेतला. पण त्यांचे खरे उत्तर गाजले, ते शरदराव ठाकरे आवडतात, हे!!
वास्तविक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे जरी वैयक्तिक मित्र तरी ते राजकीय शत्रूच राहिले. किंबहुना 1990 नंतर या शत्रुत्वाला विशेष धार चढली होती. शरद पवारांनी छगन भुजबळांच्या रूपाने बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक फोडून काँग्रेसमध्ये आणला. त्याचा राजकीय सूड म्हणून 1995 च्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अखंड काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव केला. शिवसेनेत छगन भुजबळ नसताना देखील बाळासाहेबांनी शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रावर आणून दाखवली. छगन भुजबळांचा माझगाव या मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर छगन भुजबळ कधीच मुंबईतून निवडणूक लढवू शकले नाहीत. त्यांना नाशिक जिल्हा आपले राजकीय कार्यक्षेत्र म्हणून निवडावा लागला.
पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातल्या नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले. बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात छगन भुजबळ देखील त्यांच्या दर्शनाला मातोश्रीवर गेले. दोघांच्या गप्पा छान झाल्या आणि दोन्ही नेत्यांची पुन्हा दिलजमाई झाली. पण ती दिलजमाई राजकीय नव्हती, तर वैयक्तिकच होती.
आजही छगन भुजबळ राष्ट्रवादीतच आहेत आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ मंत्री राहिले. हा देखील आता इतिहास झाला आहे. त्यामुळेच छगन भुजबळ यांनी आपल्या 75 व्या वर्षी दिलखुलास मुलाखत देताना शरदराव ठाकरे आवडतात, असे सांगून हीच महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यामुळेच ही महाविकास आघाडी जशीच्या तशी नजीकच्या काळात टिकेल??, याविषयी महाराष्ट्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App