विशेष प्रतिनिधी
पुणे :पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका संसर्ग झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पुणे जिल्ह्यात भेट देणार आहे. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाचे सदस्य झिका संसर्गाबाबत चर्चा करणार आहेत.Central team will visit Pune on the background of Zika infection
केंद्राच्या पथकात दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ज्ञ डॉ. हिंमत सिंग, दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. डॉ. शिल्पी नैन आणि विमानतळ आरोग्य अधिकारी प्रणील कांबळे यांचा समावेश आहे. उद्या दिवसभर हे पथक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहे.
केंद्राचे पथक मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये सकाळी नऊ वाजता राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.
साडेअकरा वाजता आरोग्य उपसंचालक यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी आरोग्य विभागाशी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित रहाणार आहेत तर दुपारी एक वाजता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात एनआयव्हीचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश गुरव यांच्यासोबत बैठक होणार आहे.
बेलसर येथे झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बेलसरसह पाच गावांमध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. अनेक जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) यांच्याकडे पाठविले. त्यातील काही जणांच्या अहवालात चिकूनगुनिया, डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले. उर्वरीत चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App