प्रतिनिधी
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सूडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला.Case registered against NCP leader, former minister Hasan Mushrif, case of defrauding farmers of 40 crores
या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल, असा इशाराही मुश्रीफ समर्थकांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा कागलच्या काही शेतकऱ्यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहेत आरोप?
बनावट कंपन्या उभारून मुश्रीफ यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सरसेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्रे दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.
हसन मुश्रीफ घोटाळा FIR दाखल एन सी पी नेता ठाकरे सरकारचे माझी मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध हजारो शेतकऱ्यांची सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखानाचा नावाने ₹40,00,00,000 चाळीस कोटी रुपये) ची फसवणूक केल्या बदल मुरगुड, कोल्हापूर पोलिस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ४२० गुन्हा दाखल pic.twitter.com/HL05U2xSMB — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) February 25, 2023
हसन मुश्रीफ घोटाळा FIR दाखल
एन सी पी नेता ठाकरे सरकारचे माझी मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध हजारो शेतकऱ्यांची सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखानाचा नावाने ₹40,00,00,000 चाळीस कोटी रुपये) ची फसवणूक केल्या बदल मुरगुड, कोल्हापूर पोलिस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम ४२० गुन्हा दाखल pic.twitter.com/HL05U2xSMB
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) February 25, 2023
याआधीही छापेमारी
11 जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर काल कोल्हापूर जिल्हा बॅकेच्या मुख्य शाखेवर सकाळी 11 वाजता शाहूपुरी येथील मुख्यकार्यालयात ईडीचे पथक पोहचले. आज दुसऱ्या दिवशीही ईडीची चौकशी कायम असल्याने कोल्हापुरातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरू आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजेत. आता कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App