Bollywood Actor Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाचे छापे सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहेत. या छाप्यात पर्सनल फायनान्सशी संबंधित एका प्रकरणात आयटी विभागाला कर गैरव्यवहाराबद्दल माहिती मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सोनूने शूटिंगसाठी घेतलेल्या पैशांमध्येही अनियमितता आढळून आली आहे. यानंतर प्राप्तिकर विभाग सोनूच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्याचीही चौकशी करत आहे. Bollywood Actor Sonu Sood Mumbai House Income Tax Raids 3rd day IT Team Inquiry
वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाचे छापे सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहेत. या छाप्यात पर्सनल फायनान्सशी संबंधित एका प्रकरणात आयटी विभागाला कर गैरव्यवहाराबद्दल माहिती मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सोनूने शूटिंगसाठी घेतलेल्या पैशांमध्येही अनियमितता आढळून आली आहे. यानंतर प्राप्तिकर विभाग सोनूच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्याचीही चौकशी करत आहे.
ही कारवाई आज संपू शकते आणि त्यानंतर प्राप्तिकर विभाग पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्याची शक्यता आहे. आयटी टीम सोनूचे अकाउंट बुक, उत्पन्न, खर्च आणि आर्थिक नोंदी तपासत आहे. गुरुवारी सकाळी थोड्या विश्रांतीनंतर तपास पथक त्यांच्या मुंबई आणि लखनऊच्या ठिकाणी रेकॉर्डची सतत तपासणी करत आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनूचे कुटुंबीय आणि त्याच्या घरी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून काही फाईल्सही सोबत नेल्या आहेत. कोरोना काळात सोनूने हजारो लोकांना मदत केली. तो ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’ नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवत आहे. ही स्वयंसेवी संस्था आरोग्य सेवा, शिक्षण, नोकऱ्या आणि तंत्रज्ञान प्रगतीवर काम करते. आयटी अधिकाऱ्यांनीही येथे चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभाग ‘रिअल इस्टेट डील’ची चौकशी करत आहे.
27 ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारने सोनूला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. यादरम्यान आम आदमी पक्षात सोनू सामील होण्याबाबतही अंदाज बांधले जात होती, पण सोनूने स्वतः सांगितले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, सोनूला आप पक्षाशी जोडल्यामुळे लक्ष्य केले जात आहे.
Caknowledge.com च्या अहवालानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंत सोनूची संपत्ती 130 कोटी आहे. सोनू सध्या पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहतो. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांतील कामासाठी त्याला ओळखले जाते. ब्रँड एंडोर्समेंट हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
सोनू प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी रुपये फी घेतो. त्याचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्याचे नाव शक्ती सागर प्रॉडक्शन आहे. हे त्याच्या वडिलांच्या नावावर आहे. सोनूने आतापर्यंत सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स आणि चित्रपटांमधून तो दरमहा सुमारे एक कोटी रुपये कमावतो, म्हणजेच एका वर्षात एकूण 12 कोटींचे उत्पन्न होते.
Bollywood Actor Sonu Sood Mumbai House Income Tax Raids 3rd day IT Team Inquiry
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App