Bollywood Actor Sanjay Dutt : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने शनिवारी नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. संजय दत्तच्या या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या गुप्त बैठकीमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. Bollywood Actor Sanjay Dutt Visit Union Minister Nitin Gadakari In Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने शनिवारी नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. संजय दत्तच्या या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या गुप्त बैठकीमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही.
संजय दत्त शनिवारी नागपूरला पोहोचला होता आणि त्यानंतर त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान गाठले. गडकरींची भेट घेतल्यानंतर संजय दत्तने त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वादही घेतले. या भेटीवेळी संजय दत्तने गडकरी यांच्या घरात बांधलेल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे त्याने बाप्पासमोर बसून प्रार्थना केली. यादरम्यान गडकरीही उपस्थित होते.
संजय दत्त महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरीही गेला होता. येथे त्याने त्यांचे सुपुत्र आणि स्नुषेचीही भेट घेतली. विशेष म्हणजे नितीन राऊत यांच्या मुलाचे लग्न फेब्रुवारीमध्येच झाले होते. परंतु वाढत्या संसर्गामुळे त्यांना रिसेप्शन रद्द करावे लागले.
सन 2019 मध्येही संजय दत्त अचानक गडकरींना नागपुरात त्यांच्या घरी भेटण्यासाठी पोहोचला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ही बैठक झाली. त्यावेळीही राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.
Bollywood Actor Sanjay Dutt Visit Union Minister Nitin Gadakari In Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App