मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा!!


प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय मुहूर्तावर लोकमत वृत्त समूहाने घेतलेल्या एका मुलाखतीत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देताना राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवले. मुख्यमंत्रीपद ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनेपासूनची दुखरी नस राहिली आहे. नेमक्या याच विषयावर भाष्य करताना अजितदादांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. Blame it on NCP leadership, ajit Pawar says, giving chief ministership to Congress was a mistake, by NCP!!

2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा 72 जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद सोडून द्यायला नको होते. तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच होती, अशा शब्दात अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर म्हणजे थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.अजितदादांना नेहमी पहाटेच्या शपथविधी बद्दल प्रश्न विचारण्यात येतात. तू पहाटेचा शपथविधी नव्हता आठ वाजता शपथविधी झाला होता. असे प्रश्न आता विचारू नका, असे उत्तरही देतात. पण प्रथमच त्यांनी 2004 मधल्या मुख्यमंत्री पदाच्या संधीबाबत सविस्तर उत्तर दिले आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 72 जागा, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. तब्बल 13 दिवस नेतृत्वाचा घोळ चालल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी मुत्सद्देगिरीने काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद खेचून आणले होते. त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला जादाची काही मंत्रिपदे देऊन बोळवण केली होती. या राजकीय घटनेचा उल्लेखच अजितदादांच्या मुलाखतीत आला आहे.

2004 मध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद सोडायला नको होते. तेव्हा जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद मिळवले असते आणि पक्ष नेतृत्वाने कोणालाही मुख्यमंत्री केले असते, तरी त्यात नंतर कधीच बदल होऊ शकला नसता. म्हणजेच राष्ट्रवादीकडे कायम मुख्यमंत्री पद राहिले असते, असे वक्तव्य अजितदादांनी केले आहे. त्यावेळी आपण ज्युनियर होतो. छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड हे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यापैकी कुणालाही मुख्यमंत्रीपद दिले असते तरी चालले असते असे प्रथमच भाष्य अजितदादांनी केले आहे. त्यामुळे थेट शरद पवारांच्या निर्णयावर अजितदादांनी टीकेचे बोट ठेवण्याचे दिसत आहे. त्याचवेळी अजितदादांनी मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्नांबरोबर नशिबाचीही साथ लागते, असेही वक्तव्य केले आहे.

पण अजितदादांच्या या मुलाखतीतून राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले गेले आहे. परंतु, त्यावर अद्याप तरी राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. किंवा दस्तुरखुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजितदादांच्या वक्तव्यावर अद्याप भाष्य केलेले नाही. पण अजितदादांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीमध्ये विशिष्ट खळबळ निर्माण करणारे ठरणार आहे हे मात्र निश्चित!!

Blame it on NCP leadership, ajit Pawar says, giving chief ministership to Congress was a mistake, by NCP!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”