Akola MLC Election Result : नागपूरनंतर अकोलाही सर ! अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी ; शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली.BJP’s Vasant Khandelwal wins in Akola


विशेष प्रतिनिधी

अकोला : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. नागपूरनंतर अकोलाही भाजपने सर केले आहे. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे.

वसंत खंडेलवाल यांना 438 मत तर शिवसेनेचे (shiv sena) गोपिकीशन बाजोरिया यांना 330 मते मिळालीत.

अकोला मतदारसंघात 98.30 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होती.  अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

BJP’s Vasant Khandelwal wins in Akola

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात