मुंबईत चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड!


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकरच्या वसुलीखोरीची आणि गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पत्रा चाळ असलेल्या वाॅर्डमधून भाजपाने हे पोलखोल आंदोलन सुरु केले. मात्र पोलखोल यात्रा सुरू होण्यापूर्वीच रथाची मोडतोड करण्यात आली आहे. BJP’s Polkhol rally chariot vandalized in Chembur, Mumbai!

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा भाजपाला संशय आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीतमध्ये पोलखोल अभियानाच्या रथाचे उद्धाटन केले जाणार आहे आणि या उद्घाटनापूर्वी मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.



सोमवारी रात्री जी. डी. गिडवणी मार्ग या ठिकाणी असलेल्या भाजपच्या कार्यालय जवळ एका मोटारीचा रथ तयार करून त्याला विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेला होते. या रथाच्या सुरक्षेसाठी रथाजवळ रात्रभर कुठलेही कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले नव्हते, याचा फायदा घेत अज्ञात समाज कंटकाने या रथावर दगड मारून रथाची काच तोडली असल्याची माहिती पोलीसानी दिली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच या घटनेची दखल घेण्यात आलेली असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून दगड मारणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. प्रवीण दरेकर यांचा कार्यक्रम सुरू झालेला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे .

रात्री 1.00 नंतर या भाजपच्या पोलखोल रथाची गाडीची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समोरची ड्रायव्हर समोरील काच फोडण्यात आली आहे. पण नेमका हा प्रकार कोणी केला हे मात्र समजू शकलेले नाही. चेंबूरमधील भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारची मुंबईतील कामांची पोलखोल करण्यासाठी भाजपने हे अभियाना राबवले आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर यांच्या हस्ते यांचे उद्घाटन होणर आहे. त्यापूर्वीच भलामोठा दगड मारत रथाची काच फोडून मोडतोड केली.

BJP’s Polkhol rally chariot vandalized in Chembur, Mumbai!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात