विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पहिला विजय; कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पाच निवडणुकांपैकी कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिला विजय नोंदवला आहे. BJP’s first victory in Legislative Council elections

औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदार संघ आणि नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पाचही मतदार संघात कुणाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पैकी कोकण शिक्षक मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. यात भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार  ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.

भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.

– हा धक्का- जयंत पाटील

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

BJP’s first victory in Legislative Council elections

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात