भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, सामनातून वादग्रस्त नेत्यांवर थेट हल्ला


सत्ता ही शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. BJP’s Batagya Mahamandal is a hired dog on Shiv Sena, attacking controversial leaders from the match


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पाठीमागील काही दिवसांपासुन भाजपचे नेते आणि शिवसेनेशी वाद घालत आहेत.त्याला कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणुक. भाजपचे एकापाठोपाठ एक नेते शिवसेनेवर शाब्दिक हल्ला करतात आणि चर्चेत येतात.मग यात पडळकर, राणे आणि आता प्रसाद लाड असो.परंतु ज्या त्या वेळी शिवसेना नेते टीकेला उत्तर देत असतात. पण शिवसेनेची अस्मिता असणाऱ्या सेना भवनावर हल्ला करण्याची भाषा प्रसाद लाड यांनी केली.

मग काय मुख्यमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यत सगळेच जण खवळले .आजच्या सामना अग्रलेखातून भाजपच्या वादग्रस्त नेत्यांचा समाचार घेताना संजय राऊतांनी वाटेल ती विशेषणं वापरलीत. बाटगे, झुरळ, कुत्री, बेवडे. शेवटी भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरुन मराठी अस्मितेवर दारुच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही.तरीही अंगावर यायचे असेल तर या , अर्थात तेनढी मर्दानगी अंगात असेल तर , पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. असा इशारा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातुन भाजपाला दिला.सत्ता ही शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हती आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधी लढल्याच नाही.आजच्या भाजपा पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासुन गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे.घरभेद्यांच्या लिषेधाच्या आरोळ्यांना ही शिवसेना कधी गडबडली नाही,दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपाच्या फसवेगिरीन नाउमेदी झाली नाही.उलट ज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली.

कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. शिवसेना अनेक अग्निदिव्यांतून पावन होऊन पुढे गेली आहे. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचे बळ कधीच नव्हते. तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ राहिले.

शिवसेना ही ज्वलंत मराठी मनाची संघटना म्हणून कायम स्वबळावरच जगत आहे. आरामखुर्चीवाले तत्त्वज्ञान आणि बाटग्यांच्या गोतावळ्यातले मखरबंद राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. सत्ता ही शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलले की एक झापड दिली तर उठणार नाहीत. हे पक्षप्रमुखांचं वक्तव्य आहे. सामनातही आम्ही सांगितलं आहे. स्वत:च्या पायावर याल आणि खांद्यावर जावं लागेल. ज्यांनी अशी भाषा आणि घाणेरडा विचार केला त्यांचं काय झालं याच्या नोंदी इतिहासात आहेत,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. मराठी माणसांच्या न्याय्य , आशा – आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना ! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले ( बाटगे ) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे.

BJP’s Batagya Mahamandal is a hired dog on Shiv Sena, attacking controversial leaders from the match

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण