भाजपच कमळावर 288 जागा लढवेल; जयंत पाटलांचा हा शिंदे गटाला टोला की राष्ट्रवादीचेच वाभाडे??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या आयटी सेलमध्ये दिलेल्या भाषणात भाजप महाराष्ट्र विधानसभेच्या 240 जागा लढवेल, असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यात त्यांच्यातली फट वाढवण्याचा कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः पुढे येऊन भाजप आणि शिवसेनेत असे कोणतेही जागावाटप नसल्याचे जाहीर केले आहे आणि त्यांचा संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडिया वरून हटाविला आहे. तरी देखील विरोधकांना बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे हातात आयते कोलीत लागले आहे. BJP will contest 288 constituencies in maharashtra assembly own it’s own, but is it a pinch to eknath shinde or punch to NCP itself by jayant patil??

त्यामुळेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निमित्ताने शिंदे गटाला एक टोला हाणून घेतला आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक भाजप एकटाच कमळ चिन्हावर 288 जागा लढवेल. शिंदे गटाचे नामोनिशाणही विधानसभा निवडणुकीपर्यंत शिल्लक राहणार नाही. पण त्यांना जरी भाजपने 40 जागा दिल्या, तरी त्यांच्यापैकी चार-पाच आमदार निवडून येऊ शकतील, असा दावा जयंत पाटील यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे.



पण हा टोला जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंना हाणला आहे की त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत??, हा प्रश्न पडला आहे. कारण जयंत पाटलांसारखे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा भाजप 288 जागा लढवेल, असे म्हणतात त्यावेळी ते भाजपची ताकद मान्य करतात आणि त्याच वेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कधीच महाराष्ट्रात 288 जागा लढवू शकलेली नाही हेही वास्तव मान्य करतात. मग भले ते उघडपणे एकनाथ शिंदे यांना टोला लगावत असतील, प्रत्यक्षात त्यांनी स्वतःच्याच राष्ट्रवादीचे वाभाडे काढले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊ नका 24 वर्षे झाली आहेत. 24 वर्षांत एकही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे 288 जागा जागांवर उमेदवार उभे करून लढवलेली नाही. कायम राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसशी आघाडी करून दुय्यम भूमिका घेत जास्तीत जास्त मजल 72 पर्यंत मारली आहे. त्यापुढे राष्ट्रवादीचा कधी आकडाही गेलेला नाही. म्हणूनच जयंत पाटलांनी भाजप 288 जागा लढवून शिंदे गटाचे नामोनिशाण उरणार नाही असे म्हणून एकनाथ शिंदे यांना टोला हाणला असला तरी प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादीचीच राजकीय मर्यादा स्पष्ट करून वाभाडे काढले आहेत आणि भाजपची ताकद महाराष्ट्रात सर्वात मोठी असल्याची जाणीव शिंदे गट आणि स्वतःच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना करून दिली आहे. जयंत पाटलांच्या टोल्यातले हे राजकीय वास्तव आहे.

BJP will contest 288 constituencies in maharashtra assembly own it’s own, but is it a pinch to eknath shinde or punch to NCP itself by jayant patil??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात