प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विधानभवन परिसर भाजपने दणाणून सोडला. BJP MLA’s announcement on the steps of Vidhan Bhavan, Nawab Malik Hi Hi !!
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर यांसह भाजपचे आमदार हे विधानभवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारने ‘आम्ही काहीही झाले तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपने ‘काहीही झाले तरी मलिकांचा राजीनामा घेणारच’, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
त्यानुसार अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपने विधिमंडळाच्या पायरीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘दाऊद के दलालोको, जाते मारो सालोंको’, अशा घोषणा करत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App