विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांच्या घोषणा, नवाब मलिक हाय हाय!! MLAs of ruling Mahavikas Aghadi shouting slogans against the Governor; The Governor finished the speech in 22 seconds and left !!
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विधानभवन परिसर भाजपने दणाणून सोडला.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर यांसह भाजपचे आमदार हे विधानभवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारने ‘आम्ही काहीही झाले तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपने ‘काहीही झाले तरी मलिकांचा राजीनामा घेणारच’, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
त्यानुसार अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपने विधिमंडळाच्या पायरीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘दाऊद के दलालोको, जाते मारो सालोंको’, अशा घोषणा करत होते. यांना अवघ्या 22 सेकंदात आपले अभिभाषण आटपून विधीमंडळातून निघून जावे लागले.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या विषयी जे उद्गार काढले होते त्याचा निषेध सत्ताधारी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांना आपले अभिभाषण 22 सेकंदात आटोपून पटलावर ठेवावे लागले आणि ते निघून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण एकाच वेळी भाजप आणि सत्ताधारी आमदारांनी एकमेकांविरोधात घोषणा सुरूच ठेवल्या. सत्ताधारी आमदारांच्या राज्यपालांनी विरुद्ध घोषणा झाल्या, तर भाजप आमदारांनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे विधानसभेचे कामकाज पहिल्या पाच मिनिटातच स्थगित करावे लागले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विधानभवन परिसर भाजपने दणाणून सोडला.
त्यानुसार अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपने विधिमंडळाच्या पायरीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘दाऊद के दलालोको, जाते मारो सालोंको’, अशा घोषणा करत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App