आव्हाडांचे वाजे म्हणजे प्रवीण कलमे, गृहनिर्माण विभागातही वसुलीचे रॅकेट, भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

गृहनिर्माण खात्यातही गृहविभागाप्रमाणेच वसुली रॅकेट चालू आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीवार्दाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. BJP leader Kirit Somaiya’s allegations that, racket of recovery even in housing department


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गृहनिर्माण खात्यातही गृहविभागाप्रमाणेच वसुली रॅकेट चालू आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीवार्दाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी काही पुरावेही दिले आहेत. 100 रुपये प्रती फूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रति महिना 100 कोटी रुपये वाझे गँगकडून हवे असतात तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे वसुली गँगचे अधिकारी कामाला लागतात.

प्रविण कलमेला घेऊन हे अधिकारी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करतात. ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग. याप्रकरणात मंत्रालयात तक्रार केल्यानंतर काही दिवस ही वसुली गँग शांत होती. आता पुन्हा वसुली गँगचे काम जोरात सुरु आहे. कलमे हे अर्थ, आकांक्षा या बोगस एनजीओच्या नावाने पत्र देतात आणि गृहनिर्माण मंत्री त्याच्यावर निर्देश देतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि 100 पानांचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रविण कलम, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

BJP leader Kirit Somaiya’s allegations that, racket of recovery even in housing department


आणखी बातम्या वाचा

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*