नवाब मलिकांवर किरीट सोमय्यांचा पलटवार : म्हणाले- तुम्ही लवंगी फटाका फोडला, मी दिवाळीनंतर फटाके फोडणार!


राज्यात लवकरच हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळ पाहता हेही अधिवेशन हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर नेत्यांवर केलेल्या विविध आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे!BJP Leader Kirit Somaiya Criticizes Maha Vikas Aghadi Govt Nawab Malik On Corruptions Allegations


प्रतिनिधी

मुंबई : राज्यात लवकरच हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळ पाहता हेही अधिवेशन हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर नेत्यांवर केलेल्या विविध आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे!

किरीट सोमय्या भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, एक नाय… दोन नाय… पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत हे फटाके फुटणार. या ठाकरे सरकारने घोटाळे केले. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आहेत. अजित पवारांनी त्यांच्या जावयाला खुश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खुश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खुश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही अॅटम बॉम्ब फोडतो. त्यांनी लवंगी मिरची फोडली. तीही फुस्स गेली. गेले 13 दिवस नाटक सुरूय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यापासून लक्ष विचलित करायचं होतं. रोज उठून मलिक ट्विट करतात, फेसबुकवर पोस्ट टाकतात, नंतर पीसी घेतात. वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहेत.. मुस्लिम नाहीत, दलित आहेत… क्रांती रेडकरचा नवरा मुस्लिम आहे… त्याचं पहिलं लग्न झालं… हे झालं अन् ते झालं… गेल्या 13 दिवस हेच सुरूय. काय लावलं आहे महाराष्ट्रात? 13 दिवस तुम्ही नाटक केलं. तुमच्या सरकारचं तेरावं आम्ही करणार आहोत. या वानखेडेने काय केलं? त्यांची चूक झाली असेल तर करा ना तक्रार! असेही ते म्हणाले.

BJP Leader Kirit Somaiya Criticizes Maha Vikas Aghadi Govt Nawab Malik On Corruptions Allegations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था