भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण ; ट्विटरवरून माहिती दिली


२८ तारखेला मुंबईत हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला होता.BJP leader Harshvardhan Patil infected with corona ; Reported from Twitter


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोणची लागण झाली आहे. पाटलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांनी स्वतः यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे २८ तारखेला मुंबईत हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला होता.दरम्यान आज हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली.त्यामुळे या विवाहसोहळ्यात उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती. म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.या विवाहसोहळ्यात हजेरी लावलेले नेते एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत, त्यामुळेआणखी काही लोक कोरोना बाधित होण्याची शक्यता आहे.

BJP leader Harshvardhan Patil infected with corona ; Reported from Twitter

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण